Wednesday, February 3, 2010

पिंटूचा अभ्यास

पिंटूची पाटी छोटी छोटी

अक्षर त्यावर काढतो मोठी

पेन्सिली हव्यात दिवसाला चार

म्हणतो "अभ्यास करतो मी फार"

दोनच आकडे नी अक्षर तीन

काढून त्याला येतो शीण

पाटी पेन्सिल दफतरात भरून

"झाला" म्हणतो " अभ्यास करून "

आजोबांच्या ट्रंकेत
आजोबांच्या ट्रंकेमध्ये ढब्बू पैसे आहेत चार
बंदा रूपया चांदीचा जपून ठेवलाय जीवापाड
ट्रंकेमध्ये आहे त्यांच्या पोशाख एक खादीचा
त्यातच त्यांनी लपवलाय फोटो माझ्या आजीचा.
छोटी दोन पिस्तुलेही आहेत त्यात जर्मनची
ग्रामोफोनच्या तबकडया ज्यात गाणी एस डी बर्मनची
स्वातंत्र्य लढ्यात आजोबांनी भोगला होता कारावास
मोठमोठ्या नेत्यांशी दोस्ती त्यांची होती खास
लढ्यात होते त्यांच्यासोबत मोठे बंधू भाऊ, दाजी
खंबीरपणे त्यांच्यापठी राहिली होती तेव्हा आजी
त्यावेलचे खूप फोटो आहेत त्यांच्या साठवणित
ट्रंक उघडून बसतात तेव्हा रंगून जातात आठवणित
हल्ली तर आजोबा नेहमीच ट्रंक उघडतात
जवळ कोणी गेला तर त्याच्यावरती बीघडतात
खचून गेलेत आजोबा आजीच्या जाण्याने
फोटो बघत आजीचा डोले भरतात पाण्याने